बोधकथा

---------------○●बोधकथा●○-----------------

●○सुभेदार व त्याचा घोडा○●

एका सुभेदाराचा घोडा खुप देखणा व चपळ होता पण त्यापेक्षा कमी प्रतीचा एक घोडा त्याने विकत घेतला व त्याचे लाड करण्यात व खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात तो बराच वेळ घालवू लागला.एकदा तो घोडा पहिल्या घोड्याला म्हणाला, 'दादा, तू इतका सुंदर व चपळ असताना तुझ्याकडे दुर्लक्ष करून माझेच लाड करण्यात इतका आनंद वाटतो, याचे कारण काय? पहिला घोडा म्हणाला, 'कोणतीही वस्तू नवी असली म्हणजे तिची विशेष काळजी घ्यावयाची व थोडी जुनी झाली की तिच्याकडे दुर्लक्ष करायचे हा सर्वसाधारण माणसाचा स्वभाव आहे. आजकाल मालक तुझे लाड करतो पण थोड्याच दिवसांत तूही त्याला आवडणार नाहीस व तुझ्याजागी नवा घोडा येईल याबद्दल खात्री असू दे'!

तात्पर्यः
-- नव्याचे नऊ दिवस!
----------------------------------------------------------

●○यशप्राप्ती○●

एकदा स्वामी विवेकानंद शाऴेत असतनाची गोष्ट आहे.

  स्वामी विवेकानंदाचे खरे नाव नरेंद्र होते.त्यावेऴी नरेंद्र ची उद्या परीक्षा असते.पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जावून विणा वाजवत बसलेले असतात.

तेवढ्यात तेथे त्यांचा मित्र त्यांना शोधत येतो.आणी म्हणतो.अरे नरेंद्रा उद्या आपली वार्षिक परीक्षा आहे.आणी तू अभ्यास करण्याऐवजी इथे येवून विणा वाजवत बसलास.तू कसा पास होशील.

तेंव्हा नरेंद्र म्हणाला अरे मित्रा उद्याची परीक्षा आपण वर्षभर काय केले याची आहे.मीआज काय करतो याची नाही.हे उत्तर ऐकून मित्र निरूत्तर झाला.

*तात्पर्यः

    कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिऴवायचे असेल तर सुरूवातीपासून कष्ट केले पाहीजे.
एका दिवसात यश प्राप्त होत नाही.
----------------------------------------------------------
●○मुर्खाशी वाद○●

गवताच्या रंगावरून एकदा गाढव & वाघ यांच्यात वाद झाला.

गाढव : "गवताचा रंग निळा"
वाघ : "गवताचा रंग हिरवा"


वाद खूप वेळ चालला
तरी दोघांमधे एकमत

होऊच शकले नाही.
शेवटी मामला जंगलच्या राजाकडे गेला


सिंह दरबारात सुनावणीचे सर्व तयारी झाली.
दोन्ही पक्षांनी आपापली बाजू मांडली.


जंगलातले सर्व प्राणी उत्सुकतेने निर्णयाचे वाट पाहू लागले

सर्वांच्याच अपेक्षांच्या विपरीत निर्णय आला

"वाघाला एक महिन्याची कठिण सजा व गाढव निरपराधी"

निर्णयाने नाराज होऊन वाघ राजाला विचारता
"गवताचं रंग हिरवंच ना ???"

राजा : "होय"

वाघ : "मग मला का ही सजा?"
 राजा म्हणाला

"तू बरोबरच आहेस, पण ह्या एका विषयावर गाढवाशी वाद घालणे हे चुकिचे आहे."


"ह्या पुढे तरी अज्ञानी बरोबर वाद घालू नये म्हणून ताकीत देण्यासाठी ही शिक्षा दिली आहे."

तात्पर्यः मुर्खाशी वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो.
----------------------------------------------------------
○○लहान झाड○○

नदीच्या काठी मोठे झाड होते ते सोसाट्याचा वारा आला असता पडले व नदीतील पाण्याबरोबर वहात चालले.
वाटेत नदीकाठी उभे असलेले एक लहान झाड त्याला दिसले. तेव्हा त्याने त्या लहान  झाडाला विचारले, 'अरे, या वा-याने माझ्यासारखं मोठ झाड पाडलं, त्या  वा-याच्या सपाट्यातून तू कसा काय वाचलास?
              त्यावर लहान झाडाने उत्तर दिले , 'अरे मित्रा, तुझ्या नि माझ्या वागण्यात बराच फरक आहे, तेच त्याचं कारण होय.
 बलवानांपुढे आपलं चालणार नाही हे लक्षात  घेऊन मी वा-यापुढे नम्र होतो पण आपल्या शक्तीच्या गर्वामुळे तू ताठ उभा राहतोस.'


तात्पर्यःसमर्थापुढे दुर्बलाने नम्रपणे वागावे. तसे न करता जे उद्दामपणे वागतात ते ब-याच वेळा स्वतःचा नाश करून घेतात.
----------------------------------------------------------
○○समुद्रातील मासा○○

एका नदीतील मासा पुराच्या पाण्याच्या ओढीमुळे समुद्रात वाहुन गेला. समुद्रातील माशांना तो आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मानू लागला. त्यांना म्हणू लागला,'देश, जात, कुळ  या तिन्ही बाबतीत मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
       
              तेव्हा हे लक्षात  घेऊन तुम्ही सर्वांनी मला उच्चासनावर बसवून माझा सन्मान करावा'.
 त्यावर समुद्रातील एक मासा  त्याला म्हणाला,  'अरे असं मूर्खासारखं पुन्हा बोलू नकोस.  जर एखाद्या कोळ्याच्या जाळ्यात दोघेही जण सापडलो तर दोघात श्रेष्ठ कोण  ते कळेल.कोळी सांगेल ती किंमत देऊन श्रीमंत लोक  खाण्यासाठी मला विकत घेतील, पण तुला तो कोळी एखाद्या गरीब माणसाला फुकटही देऊन टाकेल.


तात्पर्य : नुसत्या जात कुळ ह्यावर मोठेपण अवलंबून नसते तर ते गुणावगुणांबरोबर अवलंबून असते .
--------○○○---------●●●--------
○○●मूर्खांचे निष्‍कर्ष ●○○

एका खगोलशास्त्रज्ञाने दुर्बिणीतून सूर्याचे निरीक्षण केले. त्‍याला निरीक्षणातून असे कळून आले की सूर्यावर प्रचंड मोठा प्राणी आहे व आपण खूप मोठा शोध लावला या समजूतीने तो लोकांना जमवून त्‍या शोधाची माहिती सांगू लागला की '' सूर्य प्रचंड उष्‍ण तारा असूनही त्‍यावर एक प्राणी जीवंत राहतो आणि तुम्‍ही सगळे आता घाबरून राहा जर तो प्राणी पृथ्‍वीवर आला तर पृथ्‍वीचे काय होईल हे पहा.'' खगोलशास्‍त्रज्ञाच्‍या या बोलण्‍यावर काही लोकांचा खरेच विश्‍वास बसला व त्‍यांच्‍यापैकी काही लोकांनी त्‍याचा सत्‍कार करण्‍याचे ठरविले. पण जमलेल्‍या काही लोकांपैकी एक जण चिकित्‍सक होता त्‍याने त्‍या ज्‍योतिष्‍याची दुर्बिण तपासायचे ठरविले व त्‍याने ती दुर्बिण तपासली असता त्‍याच्‍या लक्षात आले की महाकाय प्राणी हा सूर्यावर नसून एक माशी दुर्बिणीच्‍या काचेवर अडकून पडली आहे आणि सूर्याकडे पाहताना ती माशी म्‍हणजे महाकाय प्राणी असल्‍याचा भास होत होता. चिकित्‍सक माणसाने ही गोष्‍ट लोकांना सांगताच त्‍यांना शास्‍त्रज्ञाचा मूर्खपणा लक्षात आला.

तात्‍पर्य :- जे लोक मूर्खपणाने किंवा उतावीळपणे बेछूट विधाने करतात किंवा सारासार विचार न करता, पुढचामागचा विचार न करता बोलत राहतात असे लोक कधी ना कधी तोंडावर आपटतात. त्‍यांचा पराभव हा निश्चित ठरलेला असतो.

●●●)सेवा हाच धर्म●●●

एका पत्रकारांनी स्‍वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकलेली होती. स्‍वामी विवेकानंदांना भेटून त्‍यांच्‍याकडून चार ज्ञानाच्‍या गोष्‍टी शिकाव्‍यात अशी त्‍यांची तीव्र इच्‍छा होती. त्‍या पत्रकारांचे दोन मित्र त्‍यांना भेटावयास आले व बोलता-बोलता स्‍वामी विवेकानंदांचा उल्‍लेख निघाला. तिघांनी विवेकानंदांना भेटायला जाण्‍याचे ठरविले. तिघेही मिळून स्‍वामीजींकडे गेले. विवेकानंदांनी तिघांचीही आस्‍थेने विचारपूस केली. यादरम्‍यान स्‍वामीजींना असे कळाले की तिघेही पंजाब प्रांतात राहणारे आहेत. त्‍या काळात पंजाबात दुष्‍काळ पडलेला होता. त्‍यांनी त्‍यासंदर्भात चर्चा केली. दुष्‍काळग्रस्‍तांसाठी चाललेल्‍या मदतकार्याची माहिती घेतली. त्‍यानंतर शैक्षणिक, नैतिक आणि सामाजिक बाबींवर चर्चा केली. ब-याच वेळ चर्चा झाल्‍यानंतर तिघेही निघाले. निघताना पत्रकार महाशय विवेकानंदांना म्‍हणाले,''स्‍वामीजी, आम्‍ही तुमच्‍याकडे धार्मिक उपदेश मिळेल या उद्देशाने आले होतो. पण तुम्‍ही मात्र सामान्‍य अशा बाबींवरच चर्चा केलीत. आम्‍हाला यातून ज्ञानवर्धक असे काहीच मिळाले नाही.'' या स्‍वामी विवेकानंदांनी मोठे मार्मिक उत्तर दिले ते असे की,'' मित्रवर्य, जोपर्यत या देशात एक जरी मूल उपाशी राहिले तर धर्माची चर्चा करण्‍यापेक्षा त्‍याची भूक कशी भागवता येईल हे पाहणे जास्‍त महत्‍वाचे आहे. ज्‍याचे पोट भरलेले नाही त्‍याला धर्मोपदेश देण्‍यापेक्षा भाकरी देणे हे महत्‍वाचे आहे. रिकाम्‍या पोटी तत्वज्ञानाचा उपदेश उपयोगी नाही.''
       
●●○राजज्‍योति षी○●●

अवंतीनगरीचे राजा बाहुबली यांना राजज्‍योतिष्‍याची गरज होती. मंत्रिपरिषदेसमोर त्‍यांनी ही इच्‍छा व्‍यक्त केली. राजज्‍योतिषाबाबत घोषणा केली जावी आणि पात्र व्‍यक्तिला निरखुन पारखून नियुक्त केले जावे अशी सर्व मंत्रिगणांनी सर्वसहमतीने ठरवले. या पदासाठी पात्र उमेदवारांनी मुलाखती द्याव्‍यात अशी दवंडी दुस-या दिवशी राज्‍यात पिटवण्‍यात आली. सर्व उमेदवार ठरलेल्‍या वेळी दरबारात उपस्थित झाले. राजाने स्‍वत:च मुलाखती घेण्‍यास सुरुवात केली. अनेक ज्‍योतिष्‍यांनी आपल्‍या ज्ञानाचे सादरीकरण करण्‍यास सुरुवात केली परंतु राजाचे समाधान झाले नाही. अखेरीस तीन ज्‍योतिषी उरले त्‍यातील पहिल्‍या ज्‍योतिष्‍याला राजाने विचारले,''तुम्‍ही भविष्‍य कसे सांगता'' ज्‍योतिषी म्‍हणाला,''नक्षत्र पाहून'' राजाने दुस-या ज्‍योतिष्‍याला हाच प्रश्‍न विचारला तेव्‍हा दुसरा ज्‍योतिषी म्‍हणाला,''हस्‍तरेषा पाहून भविष्‍य सांगतो'' राजाला कुणाचीच उत्तरे आवडली नाहीत. अचानक राजाला तेव्‍हा आपल्‍या राज्‍यातील निर्धन ज्‍योतिषी विष्‍णुशर्माची आठवण झाली. विष्‍णुशर्माला तात्‍काळ बोलावण्‍यात आले. राजाने विष्‍णुशर्माला विचारले,'' तुम्‍ही ज्‍योतिषी असूनसुद्धा या मुलाखतीसाठी का आला नाहीत. तुम्‍हाला राजज्‍योतिषी होणे आवडत नाही काय'' विष्‍णुशर्माने सांगितले,''महाराज मी घरी बसून माझ्या स्‍वत:च्‍या पत्रिकेचा अभ्‍यास केला व माझ्या अभ्‍यासानुसार या पदावर मीच नियुक्त होणार आहे. तुम्‍ही मला निमंत्रण पाठवून मला बोलावून घ्‍याल हे मला माझ्या अभ्‍यासातून आधीच कळाले होते. त्‍यामुळे मी या पदासाठी मुलाखत देण्‍यास आलो नाही.'' राजाला विष्‍णुशर्माची अभ्‍यासू वृत्ती व त्‍याचा आत्‍मविश्‍वास या दोन्‍हीचा अभिमान वाटून त्‍याने विष्‍णुशर्माला राजज्‍योतिषी म्‍हणून नियुक्त केले.

तात्‍पर्य - ज्‍यांचा स्‍वत:वर व स्‍वत:च्‍या अभ्‍यासावर प्रचंड विश्‍वास असतो ते कधीच हार मानत नाहीत व त्‍यांच्‍याकडे संधी आपोआप चालून येते


॥॥●○विजय असो○●॥॥

एकदा एका गावात दोन कोंबड्यांची झुंज सुरु झाली. भांडणाचे कारणही तसे भारीच होते, एका कोंबडीशी कुणी लग्‍न करायचे यावरून त्‍या दोघांत खूप भांडणे झाली व त्‍याचे पर्यवसान झुंजीत झाले. अटीतटीच्‍या झुंजीत दोघेही एकमेकांवर प्रहार करू लागले. मारामारीत दोघांचेही अंग रक्‍तबंबाळ झाले, त्‍यातील एकाने मग रक्तबंबाळ झाल्‍याने सरळ पळून जाऊन आपल्‍या खुराड्याचा आधार घेतला व तिथूनच तो आणि ती कोंबडी बाहेर काय चालले आहे हे पाहू लागले. भांडणात खुराड्याच्‍या बाहेर असलेल्‍या कोंबड्याला हा आपला विजय वाटून त्‍याने घराचे छत गाठले व तिथून जोरजोराने त्‍या कोंबडीकडे बघून ''मी जिंकलो, मी जिंकलो'' असे ओरडू लागला, स्‍वत:चाच जयघोष करू लागला. तेवढ्या वरून एक गरूड आला व त्‍याने त्‍या ओरडणा-या कोंबड्याला उचलले व लांब जाऊन त्‍याने त्‍याला मारून खाऊन टाकले. हे पाहिल्‍यावर पराभूत झालेला कोंबडा व कोंबडी बाहेर आले तेव्‍हा तो कोंबडा कोंबडीला म्‍हणाला,''मी जर बाहेर राहिलो असतो तर त्‍या कोंबड्यासारखीच माझी हालत झाली असती. मी माझ्या जीवाला जसा जपतो तसाच तुलाही जपेन.''

तात्‍पर्य - ज्‍याच्‍या डोक्‍यात यशाची हवा चढते तेव्‍हाच त्‍याच्‍या पराजयाची सुरुवात होते. यश पचविता येणे ही एक मोठी गोष्‍ट आहे.

               ◇◇●धनाचा विनियोग●◇◇
एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गेला. खूप खोल गेल्‍यावर त्‍याला तिथे एक धनाचा हंडा दिसला व त्‍यावर एक वृद्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता. कोल्‍ह्याने नागाला विचारले,''हे नागदेवता, तुम्‍ही इथे काय करता आहात.'' नाग म्‍हणाला,'' माझ्या पूर्वजांनी पुरून ठेवलेल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे.'' मग कोल्‍हा पुन्‍हा म्‍हणाला,'' पण इथं इतकं मोठं धन असताना तुम्‍ही कधी त्‍याचा उपभोग घेतला आहे किंवा नाही. उपभोग सोडा थोडंफार धन दानापोटी तरी खर्च केलंत काय'' नाग म्‍हणाला,'' कसं शक्‍य आहे, हे धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून रक्षण करत आहे. त्‍याचा उपभोग घेणे किंवा दुस-याला दान देणे ह्यापेक्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍त आनंद आहे.'' हे ऐकून कोल्‍हा नागाला म्‍हणाला,'' मग नागदेवा, तुमच्‍या असल्‍या या श्रीमंतीपेक्षा मी गरीब आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घेतला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा धनाचा काय उपयोग''

तात्‍पर्य - ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ संचय केला जातो त्‍या धनाचा मनुष्‍यमात्राला काहीच फायदा नाही.

           ◇◇मूर्ख डोमकावळा◇◇

एका गरूडाने कुरणात चरत असलेल्‍या मेंढ्यांच्‍या कळपातील एका कोकरावर झडप घातली व त्‍या कोकराला पळवून नेले. त्‍याचे हे धाडस आणि सामर्थ्‍य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्‍या गरूडाकडे भीतीयुक्‍त आदराने पाहू लागले. 'गरूडाने पळवले त्‍यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरूडापेक्षाही आपला मानसन्‍मान वाढेल, त्‍याच्‍याइतकीच प्रतिष्‍ठा आपल्‍याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले. त्‍यासाठी त्‍याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्‍या पाठीवर बसून त्‍याला उचलण्‍याचा प्रयत्‍न केला पण ते कोकरू उचलले जाण्‍याऐवजी, डोमकावळ्याचेच पाय कोकराच्‍या पाठीवरील लोकरीमध्‍ये अडकले व तिथून सुटण्‍यासाठी त्‍याने पंखांची केलेली फडफड व आरडाओरड मेंढपाळाच्‍या कानी गेली. तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''
तात्‍पर्य - काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणण्‍याची प्रचंड सवय असते. यामध्‍ये त्‍यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी इतर सूज्ञ लोक हे त्‍यांची पात्रता जाणून असतात.
............○●○..................●○●.......

No comments:

Post a Comment

Covid-19 (कोरोना)

○खबरदारी हाच उपाय○