आरोग्य

आरोग्यविषयक महिती पुस्तके pdf स्वरूपात Download करा.

●आंतरराष्ट्रीय योगा दिवस - योगासने pdf●

Download

●योगासने- विधी व प्रकार pdf●

Download

●आहारशास्र pdf●

Download


😎😎😎शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यास होणारे आजार!

आपल्या शरीरात जेव्हा कोलेस्टेरॉल वाढते तेव्हा शरीरामध्ये अनेक बदल व्हायला लागतात. मात्र या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये. कारण पुढे जाऊन यातून एखादा मोठा आजार बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे आज जाणून घेऊयात शरीरातील कोलेस्टेरॉल वाढल्यास होणारे आजार कोण-कोणते आहेत?

1) रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी जास्त वाढली तर ब्लड व्हेसल्स ब्लॉक व्हायला लागतात. यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह प्रभावित होतो. मान आणि खांद्यांमध्ये सूज आणि वेदना जाणवू शकतात.

2) रक्तामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढल्यास तुमच्या डोळ्यांच्या वर किंवा खालच्या पापण्यांवर पिवळ्या रंगात वाढ होते. कोलेस्टेरॉल पातळी नियंत्रित करत यापासून सुटका मिळू शकते.

3) अनेकदा व्यायाम केल्यानंतर वेगाने धावणे किंवा पायऱ्या चढल्यानंतर थकवा जाणवत असेल आणि हृदयाचे ठोके वेगाने होत असतील तर हे कोलेस्टरॉल वाढण्याचे कारण आहे.

4) रक्तामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यानंतर शरीरातील ब्लड व्हेसल्स बंद व्हायला लागतात. त्यामुळे हात आणि पाय थरथरत असल्यासारखे वाटते किंवा हात-पायांमध्ये वेदना होतात.

5) अचानक कोणतेही कारण नसताना वजन सातत्याने वाढत असेल आणि तुम्हाला दर वेळी जड-जड वाटत असेल तर हा हाय कोलेस्टेरॉल लेव्हल वाढण्याचा संकेत असू शकतो.

6) तुमच्या डोळ्यांचा पांढरा भाग म्हणजेच कॉर्नियाच्या आसपास तपकिरी रंगाच्या रिंगसारखे काही तरी दिसत असेल तर तुमचे कोलेस्टेरॉल वाढले असे समजा. साधारणत: ही स्थिती वृद्धांमध्ये जास्त असते.




No comments:

Post a Comment

Covid-19 (कोरोना)

○खबरदारी हाच उपाय○